आषाढी एकादशीचे महत्त्व Ashadi Ekadashi


img

देवशयनी एकादशी

देवशयनी एकादशीचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.असे म्हणतात की देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू निद्रेत जातात आणि चार महिन्यानंतर देवप्रबोधिनी एकादशीच्या दिवशी उठतात. पुराणानुसार या चार महिन्यात भगवान विष्णू पाताळ लोकात राजा बलिच्या जवळ ते राहतात. म्हणून म्हणतात की परमेश्वर निद्रेत आहेत. या चार महिन्याना चातुर्मास म्हणतात. हेच कारण आहे की या दरम्यान सगळे शुभ कार्य थांबतात. परमेश्वर निद्रेमुळे शुभ कार्य  जसे की विवाह, उपनयन ,ग्रह प्रवेश, नामकरण हे शुभ कार्ये होत नाहीत.

 

देवशयनी एकादशी  केव्हा आहे?

हिंदू पंचांगाप्रमाणे आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या वेळी ही एकादशी १२ जुलैला आहे

एकादशी तिथी प्रारंभ:- 11 जुलै 2019 रात्री 1 वाजून 03 मिनिटे

एकादशी तिथी समाप्त :- 12 जुलै 2019 रात्री 12 वाजून 31 मिनिटे

देवशयनी एकादशीचे महत्त्व

देवशयनी एकादशीला आषाढी एकादशी, पद्मा एकादशी आणि हरी शयनी  एकादशी सुद्धा म्हटले जाते. या एकादशी पासून पुढील चार महिन्यापर्यंत परमेश्वर विष्णू पाताळ लोकात निवास करतात. ज्याला परमेश्वराची योग निद्रा म्हटले जाते. या कारणामुळेच परमेश्वराच्या गैर हजेरीत कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य  केले जात नाहीत. पूजेनंतर व्रत कथा ऐकावी आरती करून प्रसाद वाटप करावे

 

केव्हा सुरु होतात शुभ कार्ये?

कार्तिक महिन्यात देव उठनी एकादशी नंतर परमेश्वर निद्रेतून जागे होतात म्हणजेच पाताळा मधून परत वैकुंठ धाम येतात आणि सगळे शुभ कार्ये आरंभ होतात.

 

देवशयनी एकादशी पूजा विधी

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे व स्वच्छ वस्त्र परिधान करावे.

या दिवशी पवित्र नदीत स्नान करायचे ही विशेष महत्त्व आहे पण असे करू शकत नसाल तर घरात गंगा जल शिडकावे 

नंतर देवघरात भगवान विष्णूची   मूर्ती स्थापित करावी आणि त्याचे पूजन करावे

 

ज्योतिष विषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क साधा.

Mobile & WhatsApp 09822807042

Neptune Jyotish: नागेशन के. पेंटा ( गुरुजी)

(ज्योतिषशास्त्री,वास्तूविशारद  संख्याशास्त्र विशारद, हस्तरेषा विशारद)