aries (मेष)


img
साप्ताहिक राशिभविष्य (18 - 24 March 2019) - हा आठवडा नोकरदारांसाठी काहीसा त्रासदायक जाण्याची शक्यता राहील. वरिष्ठांची नाराजी संभवते, पर्यायाने मतभेदाचे प्रसंग उद्भवण्याची संभावना होते. वरिष्ठांशी मिळते-जुळते धोरण स्वीकारावे. आपल्या यशासाठी अधिक प्रयत्नशील राहावे. आर्थिक बाजू ठीक राहील. कामाचा उत्साह राहील. धार्मिक कार्यात रस घ्याल. आपल्या रागावर योग्य नियंत्रण ठेवा. आपल्या मनातील विचार स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करा. आपल्या प्रकृतीबाबत अधिक लक्ष द्या. वैवाहिक जोडीदाराचा मदतीचा हात मिळेल. प्रवास कराल. 
13209