capricorn (मकर)


img
साप्ताहिक राशिभविष्य (19 - 25 August 2019) - शनी साडेसातीच्या पर्वातून आपण प्रवास करीत आहात हे विसरून चालणार नाही, त्यामुळे यशाचा मार्ग सोपा निश्चित नाही याकडे अधिक लक्ष द्या. नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. प्रकृतीस्वास्थ्याकडे अधिक दक्ष राहा. वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवावे. सरकारी नियमांचे व कायद्याचे कटाक्षाने पालन करा. बौद्धिक क्षेत्राला चांगला वाव मिळेल. नको त्या प्रलोभनात अडकू नका. हितशत्रूंना संधी देऊ नका. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. 
13377