aquarius (कुंभ)


img
साप्ताहिक राशिभविष्य (19 - 25 August 2019) - या सप्ताहात आपण सर्व कामे एकट्याने करण्याची भावना बाळगणे योग्य होणार नाही. प्रत्येक कामात दुसऱ्याचा हातभार लागतो हे ओळखून सर्वांना एकत्रित होऊन कामाचा निपटारा करणे हितकारक ठरू शकते. महत्त्वाच्या कामी ज्येष्ठांचा, वडिलधाऱ्या मंडळींचा सल्ला बऱ्याचदा मोलाचा ठरतो. या गोष्टीचे अनुकरण केल्यास पुष्कळशा गोष्टी साध्य करू शकाल. नोकरदार जिद्द, विवेक व कल्पकतेचा वापर करून यश मिळवू शकतात. विद्यार्थ्यांनी अध्ययनात अधिक परिश्रम घेणे योग्य राहील. प्रवासाचे योग येतील. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. 
13377