pisces (मीन)


img
साप्ताहिक राशिभविष्य (19 - 25 August 2019) - या सप्ताहाचे ग्रहमान पाहता ते आपणास साथ देणारे असल्याने नोकरी, व्यवसाय क्षेत्रांत आगेकूच करता येईल. प्रकृतीबाबत चालढकलपणा न करणे हितकारक ठरू शकेल. हितशत्रूंच्या कारवायांबाबत सध्या चिंता करू नयेत. भाग्यातील गुरू आपणास सर्व बाबतीत मोलाची मदत करील व आपली शान शाबूत ठेवील. आपला आत्मविश्वास वाढीला लागेल. वेळेप्रसंगी ज्येष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. प्रवासात सावधानता बाळगावी. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. जीवनशैलीत काही बदल करू शकाल.   
13377