scorpius (वृश्चिक)


img
साप्ताहिक राशिभविष्य (19 - 25 August 2019) - आपले ग्रहमान पाहता कार्यक्षेत्रात आपली धडाडी राहील आणि यशाच्या मार्गावर वाटचाल करणे शक्य होईल. सामाजिक क्षेत्रात आपली छाप पाडाल व आपले नाव उंचावण्याची संधी प्राप्त होईल. कला, शिक्षण, रसायन अशा विविध क्षेत्रांत आपण प्रगती करू शकाल. आर्थिक बाजू सावरता येईल. प्रकृतीमान ठीक असली तरी खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. बौद्धिक क्षेत्राला उत्तम वाव मिळेल. यशाच्या आशा-आकांक्षा वृद्धिंगत होतील. प्रलोभनांपासून दूर राहा. मुलांबाबत एखादा ठोस निर्णय घ्यावा लागेल. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. 
13377