sagittarius (धनु)


img
साप्ताहिक राशिभविष्य (27 - 02 June 2019) - एकूण ग्रहमानाचा विचार करता आपण करीत असलेल्या कामात परिश्रमाचे योग्य फळ मिळू शकेल. नोकरदारांना दिलासा मिळू शकेल. आपल्या मनाजोगे काम करण्याची संधी प्राप्त होईल. वादाचे प्रसंग टाळावेत. व्यावसायिकांनी अतिविश्वास टाळावा. काही हितशत्रूंच्या कारवायांचा त्रास संभवतो, त्यांना संधी मिळणार नाही याची दक्षता घ्या. मुलांबाबतचे निर्णय संमतीने घेणे योग्य राहील. अध्ययनात यश मिळू शकेल. धार्मिक बाबतीतून आनंद मिळू शकेल. वैवाहिक जोडीदाराशी जुळवून घ्या. प्रकृती जपा. 
13261