Skip to main content

Neptunejyotish

 

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना।प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥१॥

जिथे स्वामीचरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।आज्ञेविना काळही ना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला,अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥२॥

उगाची भितोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामीशक्ती कळू दे।जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे पाठी राखा,अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥३॥

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, देण्या सवे प्रेम ही तृप्त राहे।नका अंत पाहू तुम्ही स्वामींचा हा, करा प्रार्थना पूर्ण श्रद्धा असो द्या,अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥४॥

करू कल्पनेचे स्वरूप ही साचे, मनी कामना पूर्ण व्हावी तयांचे।मिळे मोक्ष ज्याला शरण जो तथासी, प्रचिती सदा लाभते भाविकांसी,अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥५॥

 

Add Your Heading Text Here

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.