Skip to main content

Neptunejyotish

हरतालिका आणि श्रीगणेश स्थापना विशेष मुहूर्त

१४ सप्टेंबर २०२६ रोजी हरतालिका व्रत आणि श्रीगणेश चतुर्थी हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत.
पंचांगानुसार सूर्योदयाच्या वेळी तृतीया तिथी असल्याने हरतालिका पूजा आणि मध्यान्ह काळात चतुर्थी तिथी असल्याने गणपती बाप्पाची स्थापना व पूजा एकाच दिवशी केली जाईल.१४ सप्टेंबर २०२६ रोजी हरतालिका आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग एकत्र येत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार या योगांमध्ये केलेली पूजा, व्रत आणि गणपती बाप्पाची स्थापना कुटुंबात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येते

तिथीची वेळ
तृतीया तिथी समाप्ती: १४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०७:०६ वाजता.
चतुर्थी तिथी प्रारंभ: १४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०७:०६ वाजता.
चतुर्थी तिथी समाप्ती: १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०७:४४ वाजता.

हरतालिका पूजेसाठी विशेष मुहूर्त
अमृत योग : सकाळी ०६:२६ ते सकाळी ०७:५७
शुभ योग: सकाळी ०९:२७ ते सकाळी १०:५८
हा दिवस सोमवार असल्याने शिवाचा वार आहे, ज्यामुळे हरतालिका व्रताचे (शिव-पार्वती पूजा) फल दुप्पट होते

श्रीगणेश स्थापना व प्राणप्रतिष्ठा विशेष मुहूर्त
चर & सूर्य होरा -सकाळी ११:०० ते दुपारी १२:३०
लाभ योग -दुपारी १२:३० ते दुपारी ०२:००

चित्रा नक्षत्राचा स्वामी ‘मंगळ’ आहे आणि याचे आराध्य दैवत ‘विश्वकर्मा’ (सृष्टीचे शिल्पकार) आहेत. गणेश मूर्तीची स्थापना किंवा कोणत्याही कलात्मक/धार्मिक कार्याची सुरुवात करण्यासाठी हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते.

Add Your Heading Text Here

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.